गॅस पाईपलाईन खोदाई काम करणाऱ्या कंपनीची वाहने राष्ट्रीय महामार्गावर; दुचाकीस्वार अपघातातून थोडक्यात बचावला.!

चौफुला – वाखारी जवळील घटना

दौंड : महान्यूज लाईव्ह

पुणे सोलापूर महामार्गालगत सुरू असलेल्या सीएनजी गॅस कंपनीसाठी पाईपलाईन चे खोदकाम सुरू आहे. मात्र वाखारी- चौफुला जवळ हे खोदकाम करणाऱ्या वाहने पुणे-सोलापूर महामार्गावर रोडवर उभी केल्याने महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा ठरत आहेत.

संबंधित कंपनी आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार थोडक्‍यात बचावला आहे, या प्रकाराकडे महामार्ग वाहतुक पोलीस आणि पाटस टोल नाका कंपनीचे पेट्रोलिंग करणारे कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत.

मागील काही दिवसांपासून पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत यवत ते कुरकुंभ अंतरापर्यंत सीएनजी गॅस कंपनीच्या पाईपलाईनचे खोदाई काम सुरू आहे. मात्र संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणा महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. ही खोदकाम करणारी मशीन आणि वाहने हे महामार्गावरच उभी केली जात असल्याने महामार्ग प्रवास करणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा होत असून नाहक त्रास सहन करावा लागतो.

परिणामी महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. चौफुला वाखारी जवळील खडकवासला कालव्याजवळ खोदाई काम सुरू आहे. याठिकाणी सुरू संबंधित ठेकेदाराने महामार्गावरच वाहने उभी केली आहेत. यामुळे पुणे बाजूकडून येणारी वाहने आणि वाखारीकडून यवत दिशेला जाणारी वाहनांना समोरून येणारी वाहने दिसत नाहीत.

यामुळे रविवारी रात्री आणि शनिवारी दुपारी या ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातामध्ये दुचाकीस्वार थोडक्यात बचावले आहेत. संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी महामार्गावर दोन्ही बाजूला काम चालू असल्याचे फलक लावलेले नाहीत. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे अपघात घडत असून त्यास तेच जबाबदार आहेत. असा आरोप प्रवाशी आणि ग्रामस्थ करीत आहेत.

या कामामुळे या ठिकाणी अपघाताची मोठी घटना घडल्यास प्रशासन जागे होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाटस टोल नाका कंपनीचे पेट्रोलिंग करणारे कर्मचारी आणि वाहतुक पोलीसांची ही जबाबदारी आहे. त्यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. पाटस टोलनाक्यास याबाबत कळवूनही टोल नाक्याकडून दखल घेतली जात नाही.

यामुळे याठिकाणी अपघात झाल्यास पाटस टोल नाक्याचे अधिकारी आणि वाहतूक पोलिस यांना जबाबदार धरावे, तसेच संबधित गॅस कंपनी आणि संबंधित ठेकेदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरीक करीत आहेत.

Maha News Live

Recent Posts

दौंड तालुक्यात तीन वाजेपर्यंत अवघं ३७ टक्के मतदान! अनेक मतदान केंद्रावर शुकशुकाट!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंड : बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळी सात पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात…

6 hours ago

आमदार दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा कथित व्हिडिओ रोहित पवार यांच्याकडून ट्वीट! पहा व्हिडिओ!

बारामती : महान्यूज लाईव्ह इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थकाला शिवीगाळ…

11 hours ago