इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर बारामती रस्त्यावर अंथुर्णे येथे टेम्पोला जोडलेल्या मिक्सरचा एक्सल चा रोड तुटल्याने मिक्सरची दुचाकीला धडक झाली आणि या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला.
अशोक दिनकर कांबळे व राजेंद्र बाळू अडकीते (दोघेही राहणार रूई तालुका इंदापूर) अशी मृत्यू झालेल्यांची नावे असून, या प्रकरणी अशोक कांबळे यांचा मुलगा अतुल अशोक कांबळे यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी टेम्पो चालक जॉकी पोपट कांबळे (रा. अंथुर्णे ) याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण भागातील बांधकामाकरता स्लॅब टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मिक्सरला घेऊन हा टेम्पो निघाला होता.
हा मिक्सर टेम्पोला जोडलेला होता, मात्र या मिक्सरचा टेम्पोला जोडलेला रॉड तुटला आणि तो मिक्सर पाठीमागून येणाऱ्या दुचाकीला धडकला. यामध्ये कांबळे आणि ओळखी ते दोघेही गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे फौजदार अतुल खंदारे करत आहेत.