अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
नायर रुग्णालयाचा शंभर वर्षांचा प्रवास करणारा थक्क आहे. अनेकदा मोठ्या कामांची सुरुवात होते पण त्यात सातत्य राहत नाही. नायर रुग्णालय तर स्वातंत्र्याच्याही २५ वर्ष आधी सुरु झाले. ही संस्था आजही सातत्याने पुढे जाते आहे, तरुण होत आहे.
काळानुरुप बदल स्विकारुन आधुनिक होते आहे. या रुग्णालयाची इमारत ही निर्जीव नाही. त्यामध्ये अनेकांनी जीव ओतलेला आहे. स्वतः जीव ओतून रुग्णांना जीवनदान देण्याचे काम अहोरात्र या रुग्णालयाने, यातील वैद्यकीय मंडळींनी केले आहे.
निव्वळ शतायुषी होवून जराजर्जर होवून उपयोग नाही, हे या रुग्णालयाने दाखवून दिले आहे. जिद्द असले तर काय होवू शकते, याचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे नायर रुग्णालय होय, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे