बीड : महान्यूज लाईव्ह
बीड जिल्ह्यातील गेवराई मध्ये विविध मागण्यांसाठी मनसे आक्रमक झाल्याचे चित्र आज दिसले. बीड जिल्ह्यातील गेवराई येथे मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांच्यासह मनसैनीकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
एकीकडे शेतकरी हा हवालदिल झाला असुन त्याने पिकविलेल्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहे. सद्यस्थितीत तर टाॅमेटोच्या भावाचा विचार न केलेलाच बरा असे असतानाच जिल्ह्यामध्ये पिके हे तग धरून होती, मात्र अतीवृष्टी झाल्याने त्याचेही नुकसान झाले आणि याच नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्याकरिता पालकमंत्र्यांनी दौरा केला. त्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे फक्त आश्वासन देण्यात आले त्यामुळे पालकमंत्र्यांचा हा दौरा वांझोटा असल्याचा आरोप मनसेचे मोटे यांनी केला.
शाळा उघडण्याच्या मागणीवरून ही मनसे आक्रमक असून राजकीय कार्यक्रम, नेत्यांचे दौरे, मोठमोठ्या यात्रा संपुर्ण महाराष्ट्रात चालू आहे, मग शाळा उघडण्यास कोरोना कसा आडवा येतो? असा प्रश्न उपस्थित करत हे सरकार राज्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणांना वेठबिगार निर्माण करण्याचे काम करत असल्याचे सांगत लवकर शाळा उघडाव्यात नाहीतर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय..