माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. ४ – नसरापूर येथील विज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात गोंधळ घालुन शासकीय कामात अडथळा आणू तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगेश हनुमंत शिंदे रा. नायगाव ( ता. भोर) याच्यावर शासकीय कामात अडथळा आणून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वीज वितरण कर्मचारी विनोद नवनाथ कसबे ( रा.कात्रज, पुणे ) यांनी फिर्याद दिली असून संशयित आरोपीला तातडीने पोलिसांनी अटक करण्याची मागणी महावितरण कर्मचारी करत आहे.
नसरापूर येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभाग कार्यालयात मंगेश शिंदे हा तरुण गेले काही दिवस त्याचा संबध नसताना प्रश्न विचारुन गोंधळ घालत सरकारी कामात अडथळा आणत होता. दि. १ रोजी सकाळी पुन्हा कार्यालयात येऊन महावितरण कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत शिंदे याने गोंधळ घातला.
वीजवितरण कंपनीचे कर्मचारी विनोद कसबे, विशाल प्रकाश गवळी, प्रतिक महादेव झांजले या तिघांना लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ढावरे करत आहेत.