खंडाळा : महान्यूज लाईव्ह
पुणे-बंगलोर रस्त्यावर खंबाटकी घाट यामध्ये वनविभागाच्या फिरत्या तपासणी पथकास विनापरवाना लाकडी कोळशाची वाहतूक करताना टेम्पो आढळला. त्यावरून (एम एच 12 एस एफ 7857) हा टेम्पो ताब्यात घेऊन पुण्यातील परमेश्वर ज्ञानोबा साबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
वनविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या रस्त्याने तपासणी करत होते. यावेळी साबळे हा विनापरवाना लाकडी कोळशाची वाहतूक करत असताना आढळला. यश अर्थिंग प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचा हा कोळसा असल्याने व तो एसटी स्टील पुणे या कंपनीने पुरवल्याकामी त्यांचीही 125 पोती लाकडी कोळसा जप्त करण्यात आला. तसेच त्यांना कोळसा पुरवणाऱ्या न्यू कोमल चारकोल डेपो यांचाही 15 पोती लाकडी कोळसा तपासणी चौकशी झाल्यानंतर जप्त करण्यात आला.
सातारा वनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक रेश्मा व्होरकाटे, महेश झांजुर्णे, खंडाळा वनक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल प्रियंका पाटील महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा वन परिमंडळाचे वनपाल आर आर जगताप, वनरक्षक श्री शिंदे, श्री राऊत, श्री गवारी, श्री मिसाळ व श्रीमती बांगर यांच्या पथकाने पार पाडली.