जालना : महान्यूज लाईव्ह
राज्यात दिवसेंदिवस भारतीय जनता पक्षाची ताकद वाढत आहे. भाजपा मित्रपक्षांना सोबत घेऊन यापुढे सर्व निवडणुका स्वतःच्या ताकदीवर लढवेल, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
ज्यांनी मोदींच्या नावावर मते मागितली आणि आमचा विश्वासात केला अशा विश्वास घातक्यांबरोबर आम्हाला काम करायचं नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगवला.
पाटील हे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाध साधला. आमच्यावर प्रेम करणाऱ्या पक्षांना सोबत घेऊन यापुढे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका लढवू आणि त्या जिंकून दाखवू असा दावा ही त्यांनी केला आहे.
यावेळी पाटील यांनी जावेद अख्तर यांच्यावर टीका केली. जावेद अख्तरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदुराष्ट्र कळलं नाही, असं म्हणत त्यांनी अख्तर यांच्यावर टीका केली. मनसे सोबत युतीचा विषय झालेला नसून राज ठाकरे यांच्यासोबत नाशिकमध्ये अचानक भेट झाल्याचे पाटील
यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र मंदा म्हात्रे यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं.
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी राज्यपालांकडे पाठवलेली 12 नावे हे काही तालिबानी प्रशिक्षण घेऊन आलेले नाही या संजय राऊत यांच्या विधानावर पाटील यांनी बोलण्याचे टाळले.
वैद्यनाथ कारखान्याच्या मॅनेजरला अटक केली हे मला माहित नाही, असं सांगत हा तपासाचा भाग आहे. त्याबद्दल मला अधिक बोलता येणार नाही.
कोरोनाच्या निर्बंधाचं कारण पुढे करून सरकारला लोकांना जास्त दिवस वेठीस धरता येणार नाही, अनिल देशमुख प्रकरणी सीबीआयचं काम सीबीआयला करू द्या. एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची पत्नी आणि जावयाविरोधात आरोपपत्र दाखल केलंय याबाबतही पाटील यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.