मुंबई : महान्यूज लाईव्ह
मुंबईच्या बोरिवली पश्चिम परिसरातील गजानन सोसायटीच्या सातव्या मजल्यावर अचानक आग लागल्याने सोसायटी कॅम्पसमध्ये खळबळ उडाली.
या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली, त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवान आणि 4 अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सकाळी आग लागली. इमारतीच्या वरच्या मजल्यावरील सुरक्षा केबिनमध्ये आग लागली आहे.
अग्निशमन दलाचे जवान सध्या आगीवर नियंत्रण मिळवत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एक अग्निशामक कर्मचारी जखमी झाला असून त्यास उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.