अनिल गवळी: महान्यूज लाईव्ह
पालघर एमआयडीसी औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट जे-१ मधील कापडाचे उत्पादन करणाऱ्या जखारिया लिमिटेड कंपनी मध्ये झालेल्या भीषण स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून अन्य पाच कामगार जखमी झाले आहेत.
सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट घडला असून तीन ते चार किलोमीटर परिसरात स्फोटाचा मोठा आवाज ऐकू गेला आहे. त्यानंतर कंपनीमध्ये मोठी आग लागली. तारापूर अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी असून आग नियंत्रणात आली आहे.