आंबेगाव : महान्यूज लाईव्ह
अक्षय बोऱ्हाडे यांनी जुन्नर मधील एका गॅस वितरकाला खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांनी अक्षय बोऱ्हाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून जुन्नर पोलिसांनी त्याला अटक केली आहे दरम्यान अक्षय बोऱ्हाडे यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान अक्षय बोऱ्हाडे याच्याविरोधात थेट त्याची पत्नी रूपाली हे देखील पुढे आली असून तिने अक्षय बोऱ्हाडे याचे अनेक महिला, मुलींशी अनैतिक संबंध असल्याचा दावा करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जुन्नर चे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी ही माहिती दिली. जुन्नर येथील गॅस वितरक व रुपेश प्राणलाल शहा यांनी यासंदर्भात खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती. रुपेश शहा यांची गॅस सिलेंडरच्या गोडाऊन ची माहिती माहितीच्या अधिकाराखाली मागितली होती. यादरम्यान बोऱ्हाडे याने शहा यांच्याकडून पैसे देण्याची मागणी केली होती. आपल्या संस्थेला येत असलेला खर्च करावा. अन्यथा फेसबुक लाईव्ह करून तुझा व्यवसाय कसा चालतो हे सर्वांपुढे बिंग फोडतो अशी धमकी त्याने दिली होती आणि त्यानंतर वारंवार फोन करून रुपेशा यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. यावरून अक्षय बोऱ्हाडे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर बोराडे याला अटक केली.
दरम्यान अक्षय ची पत्नी रूपाली हिने अक्षय मोहन बोऱ्हाडे, सासू सविता मोहन बोऱ्हाडे, अनिकेत मोहन बोऱ्हाडे या सर्वांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्रास दिला, तसेच वेळोवेळी रिवाल्वर दाखवून व गुंडांची धमकी देऊन शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याची तक्रार दिली आहे.
स्वतः कोणतेही काम न करता शिवॠण युवा प्रतिष्ठान या संस्थेसाठी आलेला निधी स्वतःच्या ऐषोराम आणि मौजेसाठी अक्षय वापरत होता आणि त्याचे वेगळ्या मुलींसोबत अनैतिक संबंध असल्याची तक्रार त्याची पत्नी रूपाली हिने केली आहे.