शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे रविवारी (दि.५ ) कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त शिकापुर येथे उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे यांनी दिली.
राज्यात सत्ता स्थापनेनंतर प्रथमच खासदार संजय राऊत हे शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून यानिमित्त शिरूर तालुक्यातील जनेतेचे या मेळाव्याकडे लक्ष लागले आहे.
शिरूर तालुक्यातील आगामी होणाऱ्या निवडणुका, पक्षबांधणी याबाबत खासदार संजय राऊत, शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
शिरूर व हवेली तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या अडी अडचणी, कार्यकर्त्यांचे प्रश्न यावेळी मांडले जाणार असल्याची माहिती शिरूर शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर फराटे यांनी सांगितले.
या मेळाव्यास शिरूर व हवेली तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर यांनी केले. या प्रसंगी शिरूर व हवेली तालुक्यातील शिवसनेचे पदाधिकारी उपस्थित होते.