राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : गेल्या काही दिवसांपासून बंद पडलेल्या भिमा पाटस कारखान्यावरून आमदार राहूल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांच्यात राजकीय वाकयुध्द सुरू आहे. यात भिमा पाटसचे संस्थापक कै. मधुकर शितोळे यांच्या वंशंजांनी उडी घेतली. आता भाजपच्याच नेत्याने घरचा आहेर देत दोघांवर टिका केली आहे.
या कारखान्याच्या कारभाराची चौकशीची मागणी आम्हीच केंद्रीय सह सहकार आयुक्त, सहकार आयुक्त आणि उच्च न्यायालयात ही जाणार आहोत. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे ही तक्रार करणार अल्याचे सांगत यांची दिवाळी तुरूंगात जाईल असा गर्भित इशारा दिला आहे. आज नामदेव ताकवणे यांनी
दौंडमध्ये पत्रकार परिषद घेतली व वरील टिका केली.
या टिकेदरम्यान हे कसले दोघे एकमेकांशी भांडताहेत?.. फक्त तोंडी व प्रसारमाध्यमांमधून एकमेकांवर आरोप करीत आहेत. थेट तक्रार केल्याशिवाय चौकशी सुरू होत नसते. त्यामुळे चौकशी आम्हीच लावू. यासाठी मी स्वतःच अमित शहा यांची भेट घेणार असून ईडीकडे तक्रार दाखल करणार आहे. कै. मधुकर
शितोळे, दिवंगत आमदार राजाराम ताकवणे यांनी कष्टकरी, शेतकऱ्यांना बरोबर घेऊन घाम गाळून कारखाना उभा केला. हा कारखाना वाचला पाहिजे. तो चालू झाला पाहिजे याला आमचे प्राधान्य असल्याचे ताकवणे म्हणाले.
तालुक्यात 40 लाख मेट्रीक टन उस आहे. तालुक्यात चारशे ते साडेचारशेच्या आसपास गुहाळे आहेत, तर तीन खासगी साखर कारखाने आहेत. हे गुऱ्हाळे आणि तीन खासगी कारखाने सुरू आहेत, मग भिमा पाटसच का बंद आहे? कारखाना हा उसाअभावी बंद पडला नाही तर आर्थिक अडचणीमुळे बंद पडला आहे. तो आताच का बंद पडला आहे. याचे उत्तर विद्यमान अध्यक्षांनी द्यावे
भीमा पाटसचे विद्यमान अध्यक्ष आणि जिल्हा बॅकेचे विद्यमान अध्यक्ष हे दोघे विद्यमान
अध्यक्ष चौकशीची मागणी करीत आहेत. मग यांना चौकशी करायला अडविले कोणी? स्थापनेपासूनच चौकशी करावी अशी अध्यक्षांची इच्छा आहे, तर मग होऊ द्या स्थापनेपासून चौकशी; मुळात जप्तीची नोटीस खरी आहे का याचा शोध लावला पाहिजे.
कुल – थोरात यांचे या जप्तीची नोटीस बाबत संगनमत असून सहकार मोडीत काढण्याचे यांचे मोठे षडयंत्र आहे असा आरोप ताकवणे यांनी यावेळी केला. याबाबत मी स्वतः तक्रार करतोय, ऊस उत्पादक सभासद,कामगार यांच्या समोर सत्य येवू द्या, त्यांना कळू द्या, सभासदांच्या हक्कांचा एकमेव भिमा पाटस कारखाना हा सुरू झाला पाहिजे एवढीच अपेक्षा आमची आहे. मी तर चौकशी करावी ही तक्रार करणारच आहे. मात्र राजकीय जोडे बाजूला ठेवून आमच्या सोबत यावे असे आवाहन नामदेव ताकवणे यांनी शेवटी या पत्रकार परिषदेत केले. यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजाभाऊ कदम, बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष गोरख फुलारी, भीमा पाटसचे सभासद हनूमंत बोत्रे, प्रमोद मोरे आदी उपस्थित होते.