अनिल गवळी: महान्यूज लाईव्ह
एनएमडीसी अर्थात राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाने ऑगस्ट महिन्यात 3.06 दशलक्ष टन लोह खनिजाचे उत्पादन आणि 2.91 दशलक्ष टन लोह खनिजाच्या विक्रीसह विक्रमी कामगिरीची घोडदौड कायम ठेवली आहे.
या आधीच्या महिन्यांप्रमाणेच ऑगस्ट महिन्यात देखील कंपनीच्या 60 वर्षाच्या दीर्घ इतिहासात ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली आहे.
लोह खनिजाच्या ऑगस्ट 2020 मधील उत्पादनाशी तुलना करता उत्पादनात यावर्षी 89 टक्के वाढ नोंदली गेली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालखंडातील खनिजाच्या विक्रीच्या तुलनेत 63 टक्के वाढ झाली आहे.
गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील आकडेवारीशी तुलना करता या आर्थिक वर्षात ऑगस्ट 2021 पर्यंत लोह खनिजाचे उत्पादन आणि विक्री अनुक्रमे 44 टक्के आणि 45 टक्के ने वाढली आहे.
पुन्हा एकदा अपेक्षांपेक्षा अधिक उत्तम कामगिरी करून दाखविणाऱ्या एनएमडीसीच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुमित देव म्हणाले, “या आर्थिक वर्षामधील गेल्या पाच महिन्यांतील आपली कामगिरी अत्यंत उत्साहवर्धक आहे.
या यशामुळे विद्यमान आर्थिक वर्षात आपण ठरविलेल्या योजना अधिक आत्मविश्वासाने पूर्ण करण्यासाठी उत्तम परिस्थिती निर्माण झाली आहे. आर्थिक वर्ष 2022 मधील आपली उद्दिष्ट्ये गाठण्याच्या दृष्टीने अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले पाहिजे.