इंदापूर : महान्यूज लाईव्ह
कोरोना च्या पार्श्वभूमीवर काळजी घेत गोपाळकाला चे औचित्य साधत इंदापूर शहरातील शिवशंभो दहिहंडी संघाने नावीन्यपुर्ण उपक्रम घेत यावर्षी दहा वर्षाखालील लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी झालेल्या वेशभूषा स्पर्धेत श्लोक भांडे याने प्रथम क्रमांक पटकावला.
कोरोनाच्या काळामध्ये सर्व व्यवसाय धंदे ठप्प पडले आहेत, तर त्याचे सावट सणांवर सुद्धा प्रकर्षाने जाणवत आहे, गेली दोन वर्षे झाले कोणतेही सन किंवा धार्मिक कार्यक्रम करता येत नाही. मात्र शिवशंभो दहीहंडी संघाचे अध्यक्ष शुभम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या दहा वर्षाखालील वेशभूषा स्पर्धेत चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी लहान मुलांच्या वेशभूषा स्पर्धेत बाळगोपाळांनी एक प्रकारे आनंदोत्सव साजरा केला. स्पर्धेतून प्रथम तीन क्रमांकाना आकर्षक भेटवस्तू व दोन उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.या स्पर्धेच्या बक्षीस वितरण चा कार्यक्रम शंभू महादेव मंदिर येथे पार पडला.
या स्पर्धेत विजेता झालेले पहिले पाच क्रमांक प्रथम क्रमांक श्लोक भांडे, द्वितीय क्रमांक युगांक देवकर, तृतीय क्रमांक वंश गुंडेकर, चतुर्थ क्रमांक राजनंदिनी घोगरे व पाचवा क्रमांक- विहान जाधव याचा आला.
या वेळी इंदापूर अर्बन बँकचे माजी चेअरमन भरत शहा, माजी उपनगरध्यक्ष कृष्णा ताटे, हरिदास सामसे, ॲड.असिफ बागवान, गणपत पवार, शकिल मोमीन, रमेश पवार, जाकिर मोमीन, सोमनाथ गवळी, गोरख पवार, भाऊसाहेब पवार, ॲड. पंकज सूर्यवंशी, संतोष जाधव, लोकसेवा युथ फाऊंडेशन संस्थापक-अध्यक्ष गौरव राऊत हे उपस्थित होते.
तसेच शिवशंभो दहिहंडी संघ सदस्य राहुल खोमणे, रुपेश पवार, रोहन गाढवे, आकाश गावडे, ऋतुराज जाधव, मोहिन मोमीन, साहिल मोमीन, अंबादास ढावरे, ऋषि मोहिते, योगेश पवार, सैफ बिराजदार, शिवतेज दडस, आकाश ताटे, रियाज शेख उपस्थित होते. सूत्रसंचालन सागर पवार यांनी केले व आभार हरिदास सामसे सर यांनी मानले.