इंदापूर : महान्यूज लाईव्ह
चित्रपटामध्ये आपल्यामधील गुणवत्ता दाखवत करिअर करण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी केले.
समाजातील दुर्लक्षित तसेच उपेक्षित घटकावर प्रकाश टाकण्यासाठी युवकांनी एकत्रित येऊन ‘कपाळ’ या वेबसिरिजच्या माध्यमातून वीर मराठी प्रोडक्शनचे कार्य सुरू केले असून त्याचे उद्घाटन राजवर्धन पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
युवकांनी एकत्रित येऊन ‘कपाळ’ च्या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित व उपेक्षित घटकांवर प्रकाश टाकला आहे. वेब सिरीज च्या माध्यमातून युवकांना आपली कला दाखवण्याची एक चांगली संधी निर्माण झाली आहे.
युवकांनी या क्षेत्रात करिअर करणाऱ्या युवकांना त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या प्रोडक्शन साहित्यासाठी मदत करण्याचे देखील यावेळी त्यांनी जाहीर केले. यावेळी वीर मराठी प्रोडक्शनचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.