अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
दलित अधिकारी,कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात दलित कोब्रा संघटनेच्यावतीने स्टेशन परिसरातील आंबेडकर पुतळा परिसरात आंदोलन करण्यात आले.
शासनाच्या विविध खात्यात दलित अधिकारी यांना बदनाम करुन त्यांच्यावर दबाव टाकण्याचे काम त्यांचे वरिष्ठ करत आहेत. तसेच बिल्डरांच्या हिताकरीता शहरासह उपनगरातील झोपडापट्टी जबरदस्तीने हटविण्याचे काम महापालिकेतील सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे त्यांचा हा डाव हाणुन पाडण्याकरीता हे आंदोलन करण्यात आले.
जर दलित अधिकारी आणि झोपडवपट्टीधारकांवर अन्याय केल्यास हटके पध्दतीने आंदोलन दलित कोब्राच्या वतीने केल जाईल असे दलित कोब्राचे संस्थापक विवेक चव्हाण यांनी या वेळी सांगितले.