इगतपुरीच्या सुपुत्रावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नाशिक : महान्युज लाईव्ह

इगतपुरी परिसरातीलतील सह्याद्रीनगर येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान यांचे काल कर्तव्यावर असताना दुर्दैवी निधन झाले. वीर जवान सचिन चिकणे अमर रहे’ च्या जयघोषात केंद्रीय राखीव पोलीस दला मध्ये कार्यरत असलेले जवान सचिन चिकणे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुपारी त्यांच्या मूळगावी इगतपुरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वात आधी वीर जवान सचिन चिकणे यांच्या पार्थिवास केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले.

यावेळी आमदार हिरामण खोसकर, प्रांत तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे रमेश वर्मा, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पोलीस निरीक्षक वसंत पाथरे नागरे ,पोलीस उपनिरीक्षक दीपक पाटील, इन्स्पेक्टर अनिकेत कुलकर्णी , नगराध्यक्ष संजय इंदुलकर मुख्याधिकारी पंकज गोसावी मंडलाधिकारी नानासाहेब बनसोडे, लांस नायक विजय कातोरे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

दरम्यान, दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सचिन यांचे पार्थिव घरी आणण्यात आले होते. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या वाहनातून शोकाकूल वातावरणात अंत्ययात्रा काढण्यात आली.

अंत्ययात्रेच्या पुढे तिरंगा धरून तरूण पुढे चालत होते. सह्याद्री नगर व परिसरातून अंत्ययात्रा इगतपुरी शहरातील गांधी चौक येथे हुतात्मा स्मारक येथे आली असता नागरिकांनी वीर जवान सचिन चिकणे अमर रहेच्या घोषणा दिल्या. नंतर अंत्ययात्रा इगतपुरी येथील अमरधाम येथे पोहचली त्यानंतर त्यांना पोलिस दल व केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

त्यानंतर त्यांच्या पार्थिवास त्यांचे मोठे बंधू यांनी अग्नी दिला. वीर जवान सचिन चिकणे यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुली, एक बहिण, दोन भाऊ असा परिवार आहे.यावेळी आमदार हिरामण खोसकर, प्रांत तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे रमेश वर्मा, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पोलीस निरीक्षक वसंत पाथरे नागरे ,पोलीस उपनिरीक्षक दीपक पाटील, अनिकेत कुलकर्णी, नगराध्यक्ष संजय इंदुलकर मुख्याधिकारी पंकज गोसावी मंडलाधिकारी नानासाहेब बनसोडे, लांस नायक विजय कातोरे यांच्यासह कुटुंबीय व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maha News Live

Recent Posts

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

24 hours ago

पेशव्यांचे सावकार, बारामतीचे विकासपुरुष – बाबुजी नाईक

उन्हाळ्याच्या बोधकथा - २ घनश्याम केळकर : महान्यूज लाईव्ह बारामतीतील सिद्धेश्वर मंदिर तसेच काशीविश्वेश्वर मंदीर…

3 days ago