जगात आज काय_चाललंय? – डॉ सुजित अडसूळ, बारामती
युरोप इंग्लंड दक्षिण अमेरिकेमध्ये सध्या डेल्टा वेरियंटने धुमाकूळ घातला आहे. केसेसची संख्या खूप वाढत आहे. लहान मुलांना अजून लस दिली गेली नसल्यामुळे या संपूर्ण दोन वर्षातील ऍडमिट होण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त होत आहे.
जून महिन्यात शाळा सुरू झाल्या त्यानंतर इंग्लंडमध्ये जास्त प्रमाणात लहान मुले आजारी पडत आहेत.
काही अभ्यासानुसार नोव्हेंबर 2020 आणि जोमदार जून 2021 चा तुलनात्मक अभ्यास करता इंग्लंड मधील शाळा हेच करोना प्रसाराचे मुख्य कारण शकत नाही. कारण तेथे सतत ची वैद्यकीय तपासणी, संस्थात्मक विलगीकरण, मास्क चा वापर हे बंधनकारक झाले आहे.
शाळेशिवाय इतर बंदिस्त जागा हे रोग प्रसाराची प्रमुख ठिकाण बनु लागले आहे .कारण लहान मुले शाळेपेक्षा या ठिकाणी जास्त कालावधीसाठी असतात.आणि डेल्टा वेरियंट हा अशाच बंदिस्त जागी आणि कमी वायुवीजन असलेल्या जागी पसरत आहे. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी आहे आणि अजून लस दिली नाही. ह्यामुळे ही आजाराचे प्रमाण वाढत आहे.
बालकांसाठी कोरोना ची लस ..!
श्रीमंत देशांमध्ये अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, कॅनडा, चीन, जपान ,इस्रायल, आयर्लंड, मेक्सिको, इंडोनेशिया आणि सिंगापूर या देशांमध्ये 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लस सुरू केली आहे. यामुळे लहान मुलांचे इन्फेक्शन पासून संरक्षण तर होतच आहे, पण एकमेकांमधील प्रसारही कमी होत आहे.
सार्वजनिक आरोग्य उपाय योजना…
युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रेवेंशन अंड कंट्रोल याने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार शाळेमध्ये सार्वजनिक छोटे क्लासेस, छोट्या क्लासरूम्स, हेपा फिल्टर वापरणे, दारे आणि खिडक्यांची मार्गदर्शक तत्वे, वर्गाबाहेर बसून शिकवणे, पृष्ठभागाची स्वच्छता, मास्क वापरणे, सतत तपासणी करणे आणि संपर्कातील व्यक्तींचे मुलांचे आयसोलेशन करणे यावर भर दिला जात आहे.दोन वर्षावरील मुलांना आणि संपूर्ण स्टाफला मास्क लावणे बंधनकारक केले आहे.
👍👍