नाशिक : महान्यूज लाईव्ह
भाजपचे नेते किरीट सोमय्या आज पुन्हा राज्याच्या राजकीय वर्तुळात लवंगी फटाक्यांची माळ लावून मोकळे झाले. आज त्यांनी एकाच दगडात छगन भुजबळ व जितेंद्र आव्हाड यांना भिती दाखवली. दोन वेगळे गौप्यस्फोट करीत सोमय्यांनी भुजबळ कुटुंब राहत असलेल्या नऊ मजली इमारतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परवेज कन्स्ट्रक्शनची मालकी असलेल्या परवेज आणि भुजबळांचे संबंध काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सोमय्या यांनी केलेल्या या प्रश्नाचा, त्यांनी केलेल्या नाशिक दौऱ्याचा आणि येत्या काळात भुजबळ यांच्याविरोधातील संभाव्य कारवाईचा संबंध जोडला जात आहे. कारण आज सोमय्यांनी नाशिकमध्ये येऊन आर्मस्ट्रॉंग या कंपनीची पाहणी केली. तेथेच त्यांनी पत्रकार परीषद घेतली व भुजबळ यांच्यावर प्रश्न केले.
मुंबईतीली सांताक्रूझ येथील भुजबळ राहत असलेल्या नऊ मजली इमारतीसंदर्भात नव्याने सोमय्या यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या इमारतीचा भुजबळ यांचा नेमका संबंध काय असा प्रश्न विचारतानाच परवेज कन्स्ट्रक्शनच्या नावाने असलेल्या या इमारतीचे भाडे भुजबळ भरतात की, त्यांची मालकी येथे आहे? ही इमारत बांधण्यासाठी पैसा कुठून आला असा सवाल परवेज यांनी केला आहे. परवेज कन्स्ट्रक्शन ही बनावट कंपनी असून कंपनी चालवणारेही बनावट आहेत असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
दरम्यान आर्मस्ट्रॉंग इन्फ्रा, एनर्जी या कंपन्यांनी गिरणा शुगर विकत घेतली होती. ही गिरणा शुगर मिल म्हणजे भुजबळांची बेनामी मालमत्ता आहे. भुजबळ यांची १३० कोटींची बेनामी मालमत्मता आयकर विभागाने जप्त केल्यानंतर भुजबळ यांनी अद्यापही त्यावर काही उत्तर दिलेले नाही असे सोमय्या म्हणाले.