जगात आज काय चाललंय? : डॉ. सुजित अडसूळ
लस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती किती दिवस राहते. एका अभ्यासाच्या मध्ये उशिरा घेतलेली लसीची प्रतिकार शक्ती आधी घेतलेल्या लसीपेक्षा जास्त दिवस टिकत आहे. याचा अर्थ लस घेऊनही काही दिवसानंतर प्रतिकारशक्ती कमी होत जात आहे.
इस्राईल मधील एका पाहणी अभ्यासानुसार या महामारी मध्ये ज्या नागरिकांची सुरुवातीला लस घेऊन झाली आहे त्यांची प्रतिकारशक्ती ही मुख्यत्वेकरून delta varient of SARC CoV 2 चा विरुद्ध जास्त प्रमाणात कमी झाली आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मते तिसरा बूस्टर डोस घेतलेल्या लोकांना जरी खूप चांगलं संरक्षण मिळत असतं तरी जगातील प्रत्येक नागरिकाला किमान पहिला डोस मिळणं गरजेचं आहे आणि तिसरा बूस्टर डोस घेणे हे तेवढ्या तातडीचे नाही.
आज जगभरात जरी दिवसाला 35 दशलक्ष डोस दिली जात असेल तरीही दारिद्र रेषेखालील देशांमधील फक्त 1.3% लोकांनीच लसीचा पहिला तर जगातील 24 % लोकांनी दोन डोस मिळाले आहेत.
कोणते देश बूस्टर डोस देत आहेत?
18 ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वेनुसार 90 लाख बूस्टर डोस जगभरात दिलेले आहेत. तिसरा डोस हा समृद्ध देशातील नागरिकांना मिळालेला आहे .
इजराइल मधील दहा लाख ज्येष्ठ नागरिकांना फायझर चा तिसरा डोस देऊन झाला आहे तुर्कस्तानातील आरोग्य कर्मचाऱ्यांना जुलैपासून तिसरा डोस सुरू केला आहे . फायजर वेक्सिंन याठिकाणी वापरत आहेत. उरुग्वे देशांमध्ये 20 सप्टेंबर पर्यंत सर्व नागरिकांना तिसरा डोस देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
परंतु युएस एफडीए USFDA नुसार बूस्टर डोस हा प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांनीच घ्यावा. उदाहरणार्थ अवयव प्रत्यारोपण, कॅन्सर पेशंट इत्यादी..! इंग्लंडमध्येही सप्टेंबरपर्यंत गंभीर असलेल्या रुग्णांना तिसरा डोस देण्याचे प्रयत्न टाइम्स वृत्त मध्ये प्रसिद्ध झाले आहे. फ्रान्स आणि जर्मनी या देशातही तिसरा डोस सप्टेंबर अखेरीस दिला जात आहे.
बूस्टर साठी नवीन व्हॅक्सिन की पहिलीच?
उरुग्वे, कंबोडिया , थायलंड या ठिकाणी वेगळे वॅक्सिन वापरले जात आहेत. अमेरिकेमध्ये मात्र पहिल्या डोसचेच व्हँक्सिन वापरत आहेत. आयर्लंडमध्ये दोन वेगळ्या प्रकारचे वफायजर आणि मॉडर्ना हे वापरत आहेत. या देशांमध्ये कदाचित ऑक्टोबर पासून दोन वेगवेगळे वॅक्सिंग वापरण्याची परवानगी दिली जाईल.
दरवर्षी व्हँक्सिन घ्यायचं का?
जॉइंट कमिटी ओन व्हॅक्सिनेशन & इम्युनायझेशन चे सदस्य Mr Anthony Harden यांच्या मते इथून पुढे कदाचित आपणास तर वर्षी व्हँक्सिन ची गरज पडेल. पण हे सर्व व्हायरस मध्ये होणाऱ्या बदलांवर आणि तात्कालीन संशोधन वरती अवलंबून राहील।