दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
केंजळ गावचे अरविंद केशवराव येवले यांची आज केंजळ गावाच्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटा कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करणेत आली .
वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करणेत आला.
यावेळी वाई पंचायत समितीचे उपसभापती अनिल जगताप, सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष महादेव मस्कर, माजी जि.प.सदस्य शशिकांत पवार ,वाई बाजार समितीचे संचालक कुमार जगताप, केंजळ गावचे उपसरपंच अमोल कदम, ग्रामपंचायत सदस्य निलेश जगताप, विलासराव जगताप, शहाजी जगताप व जयंत येवले उपस्थित हाेते.