संदीप मापारी पाटील, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव तसेच मेहकर मतदार संघाचे आमदार संजय रायमुलकर यांची ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांशी थेट संवाद; सुखदुःखाच्या वेळी लग्न कार्यामध्ये वेळोवेळी प्रत्यक्ष भेट यातून ती अधिकच घट्ट बनली आहे.
श्रावण मासानिमित्त लोणार तालुक्यातील गायखेड या छोट्याशा गावातील गावकऱ्यांनी विदर्भामध्ये प्रसिद्ध असलेल्या व शेतकऱ्यांचा आवडते भोजन दाळ बट्टी कार्यक्रम गाय खेडमध्ये आयोजित करून या स्नेह भोजनासाठी खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय रायमुलकर यांना आमंत्रित केले.
खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या गाव खेड्यातील शेतकरी बांधवांसह या दाळ बट्टीचा मनमुराद आस्वाद घेतला व ग्रामीण भागातील गावखेड्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांशी संवाद साधत शेती विषयी अडीअडचणी जाणून घेतल्या.
विदर्भामध्ये प्रसिद्ध असलेल्या दाळबट्टी चे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते, परंतु कोरोना काळामध्ये कोणत्याही शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले नव्हते. परंतु दोन वर्षानंतर दाळबट्टी खाण्याचा आनंद खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांनी मनमुराद आस्वाद घेतला.
हे करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात असे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले. दाळ बट्टी हा प्रकार म्हणजे शेतातील रान शेनी, गौरी वर गौरी वर भाजलेला रोडगा, बीटी, पानगाव असे म्हणले जाते. त्याच्यासोबत वांग्याची भाजी, पिके वरण भात, मिरचीचा ठेचा, कांदा, लिंबू व शिरा हा मेनू मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात.
याचा आस्वादच लय न्यारा असे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले. हजारो रुपये खर्च करूनही ही चव तोंडाला मिळत नाही असे सांगितले. यावेळी सोबत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संतोष मापारी, शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मापारी, जिल्हा परिषद सदस्य भगवान कोकाटे, पांडुरंग सरकटे, पत्रकार नगरसेवक डॉ. अनिल मापारी, राहुल सरदार, संदीप पाटील तसेच गायखेड येथील संजय घायाळ, तेजराव घायाळ व सर्व गावकऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.