दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात यवत आणि दौंड पोलीसांनी बेकायदा दारू अड्यावर कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी रविवारी (दि. 29) मलठण आणि बेटवाडी येथील बेकायदा दारूचे अड्डे उध्वस्त करून कारवाई केली आहे.
मलठण येथे 9 हजार पाचशे लिटर ची दारू आणि दारू तयार करण्याचे उध्वस्त केले आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.
दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुर्वभागात मलठण येथील भीमा नदी काठालगत असलेल्या ज्योतीबानगर येथे बेकायदा गावठी दारूची भट्टी असून याठिकाणी दारू तयार करून विक्री केली जात असल्याची माहिती पोलीसांनी मिळाली होती.
त्यानुसार पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पोलीसांचे पथक कारवाईसाठी तैनात केले. या पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी धाड टाकली असता याठिकाणी हातभट्टीची दारू गाळण्यासाठी बाराशे लिटरचे रसायन, दारू तयार करण्याची पट्टी लावण्याचा मोठा बॅरल, त्यावर झाकण त्यामध्ये एक चाटू कंपनीचा झिरो पॉईंट 75 ऑब्लिक झिरो वन एचपी इलेक्ट्रिक मोटर पाच लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा एकूण 9 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल असल्याचे निदर्शानास आले.
पोलीसांनी दारू व दारू तयार करण्याचे साहित्य जागीच नष्ट केले असून याप्रकरणी सुभाष प्रसाद लोंढे ( रा. ज्योतिबानगर, मलठण ता.दौंड जि.पुणे ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे,
तसेच गार-बेटवाडी येथील शिरसाई मळा येथे दोन ठिकाणी धाड टाकली असता एक महिला दोन निळ्या रंगाचे प्लास्टिकचे बॅरल सुमारे दोनशे लिटर मापाची त्या दोन्ही बॅरल मध्ये मिळून अंदाजे 300 लिटर कच्ची रसायन तर तशीच एक निळ्या रंगाचे वीस लिटर मापाची प्लास्टिकचे कॅन त्यामध्ये तयार गावठी हात भट्टी दहा लिटर दारू असा एकूण 1 हजार 160 रूपांचा मुद्देमाल निदर्शानास आला.
तर दुसऱ्या ठिकाणी एक महिला 460 रूपये किंमतीचा एक पांढर्या रंगाची प्लास्टिकची दहा लिटर मापाचे कॅन त्यामध्ये तयार गावठी हातभट्टी लिटर दारू असल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी तयार दारू आणि दारूचे साहित्य नष्ट केला.
याप्रकरणी वंदना जनार्दन भोसले व मोहीनी बाजीराव भोसले (दोघी रा. शिरसाईमळा बेटवाडी
ता. दौंड जि. पुणे) यांच्यावर दौंड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले आहेत. अशी माहिती पोलीसांनी दिली.
ही कारवाई पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख, बारामती विभगाचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहीते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड, पोलीस उपनिरीक्षक आबनावे, सहाय्यक फौजदार संतोष शिंदे, पोलीस हवालदार विनोद चव्हाण, विठ्ठल गायकवाड, ज्ञानेश्वर राऊत, पोलीस नारायण वलेकर, पोलीस शिपाई सतिश हिरवे आदींनी केली.











