दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
जळ गावचे सुपुत्र तसेच स्वातंत्र्य लढ्यातील देशभक्त केंजळ गावचे माजी सरपंच डॉ. राजाराम खाशेराव जगताप (वय वर्षे 106) यांची डॉक्टर्स डिरेक्टरी इंडिया इन असोसिएशन विथ डी क्लाऊड फाउंडेशन या राज्यस्तरीय कमिटीने आप्पांची ग्रामीण भागातील आरोग्यसेवेची दखल घेऊन सन 2021 च्या अवॉर्ड्स साठी निवड केली.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय माननीय भगत सिंह कोश्यारी यांच्या सहीने आरोग्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार 2021 चे मानपत्र व गौरवचिन्ह गौरव चिन्ह सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब यांचे हस्ते केवळ डॉक्टर आप्पांचे प्रकृती अस्वस्थतेमुळे राजभवनात होऊ न शकलेला पुरस्कार वितरण सोहळा केंजळ गावी पार पडला.
सदरचे पुरस्कार सोहळ्याचे वितरण प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश कामत, कमिटी मेंबर डॉ. देवेंद्र हंबर्डीकर, डॉ. मनोज देशपांडे, डॉ. संजय कदम, डॉ. शुभदा कामत तसेच सातारा जिल्हा होमिओपॅथी असोसिएशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रवींद्र भोसले उपस्थित होते.
केंजळ गावची भूमी पवित्र असून त्या भूमीत सन 1915 मध्ये पारतंत्र्याच्या काळात जन्मलेले जगताप यांनी वयाची 106 वर्षे पार केले. त्याचा अभिमान असून माझ्या हस्ते पुरस्कार दिला जातोय, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. वयाचे 106 वर्षापर्यंतचे आरोग्य सेवा व्रत व त्यांची कामाची उमेद ही प्रेरणा देणारी आहे असे गौरवोद्गार श्री. बन्सल यांनी त्यांचे मनोगतामध्ये व्यक्त केले.
डॉ. मनोज देशपांडे यांनी आरोग्य सन्मान जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप व त्याची पार्श्वभूमी त्यांनी आपले मनोगतामधून व्यक्त केले . या पुरस्कार वितरण सोहळा निमित्त फाउंडेशन चे उपस्थित कमिटी सदस्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी शितल जानवे खराडे, भुईंज पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक आशिष कांबळे उपस्थित होते. त्यांनाही सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी केंजळ गावचे सरपंच मिलिंद गायकवाड, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती बाबर, अमोल कदम, पोलीस पाटील वसुंधरा जगताप व ग्रामपंचायत सदस्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एल. सपकाळ यांनी केले. तर प्रास्ताविक विलास गायकवाड यांनी केले. डॉक्टर आप्पांच्या जीवन पाठाचे वाचन विलास जगताप यांनी केले. अमोल कदम यांनी आभार मानले. यावेळी बन्सल यांनी केंजळ गावच्या शिवकालीन विहिरीची पाहणी केली.