संदीप मापारी पाटील, बुलढाणा
अंधश्रध्देचा सहारा घेऊन निष्पाप जीवांना अमानवीय यातना देणाऱ्या चंद्रपुर जिवती व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात जे मातंग समाजातील प्रेतयात्रा अडविण्यात अली त्यासाठी आरोपींना कठोरात कठोर कार्यवाही व्हावी या मागणीसाठी आँल इंडिया पँथर सेना लोणार च्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
२१ व्या शतकात सुध्दा जिवती (चंद्रपुर) येथे जादूटोणा केल्याचा संशय घेऊन पिडित परिवारातील महिला व वयोवृध्द लोकांना भरचौकात हातपाय बांधून मारहाण करण्याची घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे. हे सर्व घडत असतांना गावातील स्थानिय प्रशासन व इतर गावकरी काय करत होते? त्यांच्या भुमिकेची चौकशी व्हावी.
सरपंच, पोलिस पाटील व इतर जबाबदार व्यक्तींवर कारवाई व्हावी. या मागणीसाठी आँल इंडीया पँथर सेना लोणार तर्फे दिनांक २८ ऑगस्ट २०२१ रोजी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
पोलिस प्रशासनाने निष्पक्ष व कठोर कार्यवाही करावी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. प्रसंगी आँल इंडीया पँथर सेना तालुकाध्यक्ष अमित काकडे, अजय गायकवाड, सावन मोरे, समाधान मोरे, संतोष मिसाळ, वैभव प्रधान, आंनथा मोरे, वैभव घाटोळे, प्रविण मगर, मिलींद खंदारे, गजानन मगर, प्रवीण मोरे, नितेश घाटोळे, अजय मोरे, वैभव दिपके, घाटोळे, सुमित घाटोळे, समाधान बाजड, सुमित पाटोळे आदी उपस्थित होते