दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैद्य धंद्यावर कारवाई धडाका सुरूच ठेवला आहे, गुरूवारी (दि.26) सहजपुर, केडगाव, वाखारी, चौफुला – बोरीपार्धी याठिकाणी सुरू असलेले बेकायदा दारूचे अड्डे छापा टाकून कारवाई केली होती.
पोलीस निरीक्षक पवार यांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (दि.27) ही कारवाई सुरूच ठेवली आहे. यवत पोलीस स्टेशन हद्दीतील खामगाव, गाडामोडी, नांदुर, शेलारवाडी अशा पाच विविध ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदा दारू भट्ट्यांवर छापा टाकला.
या कारवाईत 14 हजार लिटर गावठी दारूचे कच्चे रासायन, विक्रीसाठी ठेवलेली तयार गावठी दारू, तसेच दारू तयार करण्याचे साहित्य असा एकूण 3 लाख 12 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला आहे.
याप्रकरणी पाच वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून तब्बल 17 आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत.
ग्रामिण पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख, बारामती विभगाचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहीते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलीस हवालदार संदीप कदम, ज्योतीबा भोसले, पोलीस नाईक गजानन खत्री, नारायण जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध व्यवसाय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे अवैध धंदे सुरू असल्यास नागरीकांनी त्वरित यवत पोलीस स्टेशनचे संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे.











