संदिप मापारी पाटील, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल झाले असून, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी जिल्ह्यातील 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.
पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात; आनंद गोपाळ यांची शेगाव शहर पोलीस ठाण्यात; खामगाव शहरचे ठाणेदार सुनील आंबुलकर यांची जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे ठाणेदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर यांची बुलढाण्यातून शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात; कल्याण शाखेचे पोलिस निरीक्षक गिरीश ताथोड यांची बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात; मलकापूर एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक एफसी मिर्झा यांची मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बुलढाणा पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांची मेहकर पोलिस ठाण्यात; अशोक लांडे यांची चिखली पोलीस ठाण्यात; सिंदखेड राजा चे पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांची देऊळगावराजा येथील पोलिस ठाण्यात; तामगाव चे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांची नांदुरा पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
बुलढाणा सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांची लोणार पोलीस ठाण्यात; नांदुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांची खामगाव पोलीस ठाण्यात; बुलढाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांची तासगाव पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे
बुलढाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद महाजन यांची मलकापूर एमआयडिसी चे ठाणेदार म्हणून; आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांची बोराखेडी पोलिस ठाण्यात; चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांची बुलढाणा शहरात नियुक्ती करण्यात आली आहे.
मेहकर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आत्माराम प्रधान यांची आर्थिक गुन्हे शाखेत तर बुलढाण्याचे अनिल पाटील यांची कल्याण शाखेचे पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल बेहराणी यांची मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यातून बुलढाण्याच्या सुरक्षा शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.
लोणार पोलीस ठाण्याचे अतिरिक्त कार्यभार असलेले पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांची एफ आर ओ शाखेत बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक केशव वाघ यांची सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांची खामगाव शहर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पदी तर देऊळगाव राजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांची बुलढाणा शहरात नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व प्रशासकीय कारणास्तव झालेल्या असल्याचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी स्पष्ट केले आहे.