पारडा दराडे येथील मल्लिकार्जुन महादेव मंदिरातील पाणी अखेर पोलीस प्रशासन व गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले
संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार तालुक्यातील पारडा दराडे येथील मल्लिकार्जुन महादेव मंदिरामध्ये मागील पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते हे पाणी बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला आजूबाजूच्या शेतकऱ्यांची समजूत घालावी लागली. अखेर प्रशासनाच्या या शिष्टाईला यश आले आणि हे पाणी बाहेर काढण्यात यश आले.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता.
या मंदिरात शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी खोदकाम करण्याची आवश्यकता होती. मात्र आजूबाजूच्या शेतातील शेतकरी हे नाली खोदकाम करू देत नव्हते, हे पाणी त्यांच्या शेतात शिरून नुकसान होण्याची भीती त्यांना वाटत होती. दुसरीकडे या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक याठिकाणी दर्शनासाठी आले, मात्र पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी जाता येत नव्हते.
अखेर आज पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, शिवछत्र मित्रमंडळाचे नंदकुमार मापारी व गावकऱ्यांच्या मध्यस्थीने त्या शेतकऱ्यांना समजून सांगण्यात आले व व्यवस्थित व्यवस्थित पाणी बाहेर काढून देण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्ठित मंडळी, बीट जमादार गजानन धोंडगे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र बोरे, पत्रकार राहुल सरदार, पत्रकार संदीप मापारी यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटविण्यात आला व मंदिरांमधले पाणी आज अखेर बाहेर काढण्यात आले.