अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत 23 ऑगस्ट रोजी ASI च्या क्रीडा स्टेडियमचे नाव ‘नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स स्टेडियम, पुणे कॅन्टोन्मेंट’ असे नामकरण करण्यात येणार आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याच्या कामगिरीचा गौरव म्हणून हे नामकरण केले जाणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह २३ ऑगस्ट रोजी संस्थेत नामकरण समारंभाचे अध्यक्ष असणार आहेत.
राजनाथ सिंह या प्रसंगी भारतीय लष्कराच्या 16 ऑलिंपियन खेळाडूंचाही सत्कार करतील. क्रीडा कोट्याअंतर्गत हरियाणातील पानिपत येथे राहणारे नीरज चोप्रा यांनी एएसआयमध्ये प्रशिक्षण घेतले होते.
ए एस आय ची स्थापना 2001 मध्ये मिशन ऑलिम्पिक कार्यक्रमांतर्गत करण्यात आली.
एएसआय ही एक बहु-अनुशासनात्मक क्रीडा प्रशिक्षण संस्था आहे. ती सात क्षेत्रात प्रशिक्षण देते. जसे की, तिरंदाजी, अथलेटिक्स, बॉक्सिंग, डायविंग, कुस्ती, तलवारबाजी आणि वेटलिफ्टिंग! दरम्यान या नामकरण सोहळ्यासाठी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे आणि दक्षिणी लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल जे एस नैन उपस्थित राहणार आहेत.