संदीप मापारी पाटील, बुलढाणा
आज तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त लोणार शहरात महाकाल कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेत मुस्लिम बांधवाकडून स्वागत व फराळ वाटप करण्यात आले.
लोणार येथील महाकाल कावड यात्रा मंडळाकडून आज तिसऱ्या श्रावण सोमवारी लोणार धारातीर्थ वरून लोणार तालुक्यातील पळसखेड येथील महादेव संस्थान पर्यंत कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले.
लोणार धारातीर्थ चे जल हे महादेव संस्थान या ठिकाणी नेण्यात आले. हा धार्मिक कार्यक्रम महाकाल कावड मंडळाद्वारे आयोजित करण्यात आला. या कावड धारी मंडळाचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. लोणार शहरातील इम्रान खान मित्र मंडळ, अस्लमभाई पठाण यांच्या वतीने साबुदाणा फराळ, चहा, केळी वाटप करण्यात आले व मुस्लिम बांधवाच्या वतीनेही कावड यात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले. तसेच लोणार पोलिसांच्या वतीने याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.