जगात आज काय चाललंय? भाग – १
डॉ. सुजित अडसूळ, #Updates_CovidRxExchange
मित्रांनो, आजपासून आपण जगभरात महामारी पसरवलेल्या कोरोना संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यालाही माहीत असेलच, कोरोनाच्या पहिला लाटेपासूनच ही संपूर्ण महामारीची साथ जगभरातल्या अनेक देशांमध्ये सुरू झाली आणि त्याचे कमी-अधिक दुष्परिणाम एक सारखे इतर देशात देखील पाहायला मिळाले आहेत.
एवढेच नाही तर इतर देशांमध्ये आलेली कोरोनाची लाट आणि त्यानंतर काही दिवसातच भारतामध्ये दिसलेले त्याचे दृश्य परिणाम, याचाही कुठे ना कुठे संबंध असलेला दिसतो. या करताच आपण आजपासून जगात काय चाललंय? ही मालिका दररोज प्रसिद्ध करणार आहोत. या मालिकेतील माहिती संदर्भात आपल्याला काय वाटले याचा फीडबॅक आम्हाला नक्की कळवा.
सध्या जेरुसलेम मध्ये covid-19 च्या पेशंटची संख्या वाढत आहे . डॉक्टर्स व शास्त्रज्ञ शोध घेताहेत की, कोणत्या प्रकारच्या वॅक्सिन नंतर लोकांना चांगलं संरक्षण मिळते आहे?
अतिदक्षता विभागात दाखल केलेल्या अर्ध्याहून जास्त रुग्णांमध्ये फायझरचे दोन डोस दिले गेले आहेत आणि आत्तापर्यंत इस्राईलमध्ये 54 लाख व्यक्तींनी संपूर्ण लस घेतली आहे. सध्या अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या 60 वर्षावरील रुग्णांना पाच महिन्यांपूर्वी लशीचे दोन रोज झाले होते. परंतु ज्यांना कोमॉरबिड कंडिशन्स, मधुमेह, हृदयविकार ,फुफुसाचे विकार आणि इतर गंभीर आजार आहेत.
या निरिक्षणानंतर इस्राईलमध्ये साठ वर्षे वरील लोकांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. वयोवृद्धांच्या तुलनेत व्हॅक्सिन घेतलेले तरुणही जास्त वेगाने अतिदक्षता विभागात दाखल होत आहेत. त्यांना ऑक्सिजनची तसेच व्हेंटिलेटरची गरज पडत आहे.
इस्त्राईल आरोग्य मंत्रालयाच्या पाहणी अहवालानुसार जर्मनीच्या बायोटेक कंपनीबरोबर विकसित केलेली फायझरची लस संरक्षण देण्यास कमी पडत आहे. आणि या लसीमुळे मिळणारे संरक्षण 90 टक्क्यांवरून 55 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. जास्त वेगाने पसरणारा डेल्टा व्हेरीयंट व दोन्ही डोस घेऊन लोटलेला सहा महिन्यांपेक्षा जास्त झालेला कालावधी,वाढलेले वय आणि इतर आजार हीच यांची प्रमुख कारणे असावीत.
इजराइल मध्ये लशीचा बूस्टर डोस देण्याची तयारी सुरू झाली असतानाच, WHO मात्र जगातील प्रत्येकास किमान पहिला डोस तरी मिळावा यासाठी आग्रह धरत आहे. (क्रमशः)
लेखकाला संपर्क करण्यासाठी – +91 99212 49544