रागिणी फाऊंडेशनच्या वतीने खास नागपंचमीनिमित्त स्पर्धेचे आयोजन..! उखाणा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आजचा शेवटचा दिवस..!

महिलांसाठी बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी :

बारामती : येथील रागिणी फाऊंडेशनच्या वतीने नागपंचमी निमित्त महिलांसाठी खास ऑनलाईन उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ऑनलाईन उखाणा स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. यावर्षी महिलांनी ‘माणुसकीचा वसा’ या विषयावर आधारित कमीत कमी ती जास्त दोन मिनिटांचा उखाणा घेणे बंधनकारक आहे.

सहभागी स्पर्धकांनी मधून प्रथम, द्वितीय, तृतीय, व उत्तेजनार्थ अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
सहभागी स्पर्धकांचे विषयाची मांडणी, सादरीकरण, समयसूचकता, एकूण प्रभाव, आणि युट्युब वरील लाईक ,कमेंट्स यावर आधारित गुणांकन केले जाणार आहे.

कोरोना काळात महिलांच्या सुप्तकलागुणांना वाव मिळावा, पारंपरिकता आणि संस्कृती सोबत वास्तव परिस्थितीवर भाष्य करता यावे, कोररोना काळातही महिलांना सणांचा आनंद घेता यावा, याकरिता या उखाणा स्पर्धेचे आयोजन केले आहे, महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी केले आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत ९६०४३९८६४५ या मोबाईल क्रमांकावर व्हिडिओ पाठवावा.

Maha News Live

Recent Posts

उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामतीत..!

बारामती : महान्यूज लाईव्ह उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी विकास कामांची…

7 hours ago