इंदापूर : महान्यूज लाईव्ह
झगडेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने ॲड.नितीन राजगुरू यांचा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्ताञय भरणे यांच्या हस्ते सन्मानपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
ॲड. राजगुरु यांच्या आई वडीलांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोलमजुरी करून शिक्षण दिले आहे. त्यांनी वकील क्षेत्रात आपल्या नावाचा एक वेगळाच ठसा उमटवला. ते आज हायकोर्ट मुंबई येथे काम करतात.
त्यांनी आतापर्यंत खुप सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. उच्च न्यायालयात त्यांच्या नावाचा एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला आहे. या त्यांच्या कार्याबद्दल इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी ग्रामस्थांनी त्यांना गौरविले.
ॲड.नितीन राजगुरू यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंत 15 व्यक्तिंचा ‘यशोगाथा विजयाची’ हा सन्मान त्यांना देऊन गौरविण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, झगडेवाडीच्या सरपंच रूपाली झगडे, उपसरपंच यशोदा राजगुरू, अतुल झगडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लक्ष्मण झगडे, प्रगतशील शेतकरी विजय झगडे,
महात्मा फुले ग्रुपचे अध्यक्ष बाळासाहेब झगडे, न्हावी गावचे सरपंच बळवंत बोराटे, डाॅ. दादाराम झगडे, संतोष राजगुरू, विष्णु मोरे, अक्षय राजगुरू, देवराज झगडे, बाळासाहेब राजगुरू, ओंकार झगडे, हनुमंत राजगुरू, सचिन राजगुरू, गणेश राजगुरू, निरज झगडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक एल.के.जगताप व ग्रामस्थ उपस्थित होते.