सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
खोरोचीतील मासेमारी करुन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या नगरे कुटुंबीयांच्या मदतीला निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील धावले. उदरनिर्वाहासाठी पाटील यांनी नगरे कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य व रोख मदत दिली.
खोरोची येथील शंकरराव नगरे यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सर्व संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाले. त्यामुळे संकटात सापडलेल्या नगरे कुटुंबीयांना निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी मदत केली.
सदरची मदत नगरे कुटुंबीयांकडे स्थानिक कार्यकर्त्यांनी सुपूर्त केली. शंकरराव नगरे यांच्या घराला गेल्या आठवड्यात सोमवारी मध्यरात्री आग लागली. या आगीत त्यांच्या घरातील धान्य, साखरेचे पोते, युरिया, २ कपाटे, कपडे, रोख रक्कम, टीव्ही, डीव्हीडी, डिश, दागिने, बेड, भांडी, मासे-मारीची जाळी, फॅन अशा जवळपास तीन ते साडेतीन लाखांच्या सांसारिक वस्तू जळून खाक झाल्या.
त्यामुळे राजवर्धन पाटील यांच्याकडून नगरे कुटुंबियांना आधार देणेसाठी जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य व रोख मदत करण्यात आली. सदरची मदत खोरोची गावातील भाजपाचे पदाधिकारी अजिनाथ कदम पाटील, राहुल कांबळे, राम कदम, राजीव भाळे, मोहन पाटील, राहुल कांबळे, उत्तम जाधव, विनोद सावंत, वैभव पाटील, सचिन फडतरे आदींनी नगरे कुटुंबीयांकडे सुपूर्द केली.