संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार तालुक्यातील सावरगाव मुंडे गावाजवळील नदीवरील पुलाची दुरावस्था झाली आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. अनेक ग्रामस्थांनी मागणी करूनही प्रशासन दाद देत नाही. त्यामुळे आज पुलाच्या रस्त्यावर ‘बेशरम’ जातीचे झाड लावून प्रशासनाचा ग्रामस्थांनी निषेध केला.
एड. शिवाजीराव सानप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या पुलाची दुरावस्था झाली आहे की, त्यातून अपघात होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात वेळोवेळी नागरिकांनी प्रशासनाला मिनतवाऱ्या केल्या होत्या. तसेच या ठिकाणी भेट देऊन पुलाची दुरवस्था बदलण्याची मागणी केली होती. मात्र अनेकदा पाठपुरावा करून देखील प्रशासन अजिबात दाद देत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
त्यामुळे आज ॲड शिवाजी सानप यांच्या नेतृत्वाखाली सदर पुलावर ‘बेशरमी’चे झाड लावुन प्रशासनाचा निषेध करण्यात आला. तसेच लवकर काम सुरु केले नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा ॲड. शिवाजी सानप यांनी दिला. यावेळी पदाधिकाऱ्यांसह गावकरी हजर होते.