माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. २१ – नसरापूर कार्य क्षेत्रात सामाजिक आणि विधायक कार्य करणारे महसूल अधिकारी, भोर तालुक्यातील पत्रकार, संजय गांधी निराधार योजना, फोटोग्राफी संघटना अशा विविध पदांवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान नसरापूर ( ता. भोर ) ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे.
महसूल विभागाचे कर्तव्यदक्ष असणारे तलाठी जे. डी. बरकडे यांची मंडलाधिकारी म्हणून
पदोनित्ती बद्दल, भोर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी वैभव भुतकर, उपाध्यक्षपदी माणिक पवार आणि कार्यकारी सदस्यपदी किरण भदे यांची तसेच संजय गांधी निराधार योजना समितीच्या भोर तालुका सदस्यपदी इरफान मुलाणी आणि भोर तालुका फोटोग्राफी संघटनेच्या अध्यक्षपदी सुधीर वाल्हेकर यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.
यावेळी सरपंच रोहिणी शेटे, उपसरपंच गणेश दळवी, यशवंतराव कदम, बळीराजा संघटनेचे कृष्णा फडतरे, ग्रामपंचायत सदस्य संदीप कदम, ज्ञानेश्र्वर झोरे, सुधीर शेडगे, राजु मिठारे, विजय जंगम, रवींद्र शेडगे, उत्तम निकम, श्यामराव कोंडे, राजगड पोलीस ठाण्याचे नाईक युवराज धोंडे, तलाठी के. के. पाटील, सोनवणे एस. जी. उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना जे. डी. बरकडे म्हणाले,की, नसरापूरमध्ये सर्व घटकातून चांगली आणि सन्मानाची वागणूक मिळाल्याने काम करण्यासाठी अधिक ऊर्जा मिळाली असून माझा झालेला सन्मान ही अभिमानाची बाब असल्याचे सांगत बरकडे भावनिक झाले होते.
उपसरपंच गणेश दळवी बोलताना म्हणाले की, नसरापूरमध्ये जे.डी. बरकडे यांनी सेवाभावी म्हणून कार्य केले असून त्यांनी गोरगरीब जनतेचे निस्वार्थपणे समस्या सोडविल्या असल्याचे सांगितले. तसेच पत्रकार बांधव आपल्या लेखणीने समाजातील वंचित घटकांना न्याय देत असल्याचे दळवी म्हणाले.
यावेळी किरण भदे, सुधीर वाल्हेकर, ज्ञानेश्र्वर झोरे आदींनी बरकडे यांच्या कार्याचा आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराव कदम यांनी केले तर आभार सुधीर शेडगे यांनी मानले.