सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
गोरगरीब कुटुंबातील रुग्णांना सेवा देण्याच्या उद्देशाने स्वानंद अध्यात्मिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाॅकडाउनच्या काळात पुणे येथे फक्त २० रुपये नाममात्र शुल्क घेऊन ओपीडी ची सेवा देत छोटेसे हॉस्पिटल सुरू केले. संस्थेला समाजातुन प्रचंड असा प्रतिसाद मिळाला.
त्यामुळे स्वानंद अध्यात्मिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सदगुरु गुरुवर्य ह.भ.प. मच्छिंद्र महाराज लांडगे यांनी गोरगरीबांसाठी अल्पदरात प्राथमिक स्वरुपात १० बेडचे हाॅस्पिटल बांधकाम करण्याचा निर्णय घेतला व आज केवळ १० महिन्यांत ४ मजली वास्तु उभी राहिली.
लवकरच हे हॉस्पिटल गोरगरिबांसाठी नवसंजीवनी ठरू पाहणाऱ्या हॉस्पिटलच्या शेवटच्या टप्प्यासाठी थोड्या मदतीची गरज आहे. दानशूरांनी थोडी मदत केल्यास लवकरच हे हॉस्पिटल गोरगरिबांसाठी नवसंजीवनी देण्यासाठी लोकार्पण करण्यात येणार आहे.
स्वानंद हॉस्पिटलच्या इमारतीचे बाहेरील प्लॅस्टर चे काम पुर्ण झाले असुन आता सध्या इलेक्ट्रिकलचे काम सुरु आहे.ह्या हाॅस्पिटल मध्ये १० बेड,एक ऑपरेशन थिएटर,ओपिडी रुम, मेडीकल, पॅथॉलाॅजी लॅब, एक्स रे,ॲम्बुलन्स सुविधा २४ तास चालु असणार आहेत.
या हाॅस्पिटलमधून गोरगरीबांसाठी विशेष सवलती दिल्या जाणार असल्याची माहिती मच्छिंद्र महाराज लांडगे यांनी दिली. एखाद्या रुग्णाची परीस्थीती अतिशय गरीब असेल, त्याला उपचार घेण्यास अडचणी असतील, अशा गोरगरीब रुग्णांसाठी संस्थेच्या स्वानंद आरोग्य फंड, या योजनेअंतर्गत मोफत उपचार देखील केले जातील असे त्यांनी सांगितले.
हे हाॅस्पिटल गोरगरीबांचे आहे. आणि ह्या हाॅस्पिटल मुळे गोरगरीबांना नवसंजीवनी मिळेल असा आत्मविश्वास देखील यावेळी बोलताना व्यक्त केला. हे हाॅस्पिटल पुणे हडपसर पासून जवळच गोसावी वस्ती साडेसतरानळी या ठिकाणी उभारण्यात येत असुन संस्थेच्या हॉस्पिटलच्या बांधकामासाठी देशातून, परदेशातून आपल्या राज्यातुन देखील देणगी प्राप्त झाली.
अमेरीका, सिंगापुर यासह देशातील केरळ, उत्तर प्रदेश, तेलंगना, मध्यप्रदेश, गुजरात, हरीयाना, दिल्ली, महाराष्ट्रातून आजवर ही मदत मिळाली. मच्छिंद्र महाराज लांडगे यांनी समाजातील दानशुरांंना मदतीचे आवाहन व विनंती केली आहे. गोरगरीबांसाठी चालु असलेल्या हाॅस्पिटलचे उर्वरीत बांधकाम पुर्ण करण्यासाठी जर आपण सर्वांनी मदत केली तर हे हाॅस्पिटल लवकरात लवकर समाजाला लोकार्पण करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
लांडगेमहाराज हे वारकरी पंथातील असुन त्यांनी आजपर्यंत संपुर्ण महाराष्ट्र तसेच तेलंगना, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश या ठिकाणी निरपेक्ष व संतपरंपरेनुसार हरीकिर्तन, सत्संग,आध्यात्मिक प्रबोधन केलेले आहे. त्यांना गोरगरीबांसाठी हे हाॅस्पिटल लवकरात लवकर चालु करावयाचे आहे. हाॅस्पिटल मुळे गोरगरीबांना चांगल्या आरोग्य सेवा देता येतील. यासाठी हाॅस्पिटल साठी मदत वस्तुस्वरुपात व आर्थिक स्वरुपात समाजातील दानशूरांनी पुढाकार घेऊन संस्थेला मदत करावी अशी विनंती केली आहे.