किशोर भोईटे : महान्यूज लाईव्ह
वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी आपल्या कार्यकाळात हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.
कोरोना काळातही त्यांनी लाकडाऊनमध्ये अत्यंत दक्ष राहून कार्य केले. लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या अनेक परप्रांतीय कामगारांना तसेच कारखान्याच्या ऊसतोड मजुरांना त्यांच्या गावी सुखरूप पोचविण्यासाठी मोलाची मदत केली.
पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेल्या गुन्ह्यांचा जलद तपास करून आरोपींना जेरबंद करण्यात त्यांचा हातखंडा होता सामान्य माणसाने एखादा मेसेज पाठविला तरी त्यावर त्वरित कार्यवाही करून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न ते करत होते. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे मत छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी व्यक्त केले.
छत्रपती कारखान्याच्या वतीने आज सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांची बदली झाल्यामुळे त्यांचा सत्कार कारखान्याच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक बीराप्पा लातुरे यांचा सत्कार कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, यांच्या हस्ते करण्यात आला. नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक बीराप्पा लातुरे यांनी समाजाचे प्रश्न ऐकून त्याचे जलद निवारण करण्यासाठी कार्य करावे. सामान्य माणसाला न्याय द्यावा असे मत कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, कार्यकारी संचालक अशोक जाधव, ॲड. रणजीत निंबाळकर, ॲड. लक्ष्मणराव शिंगाडे, राजेंद्र गावडे, नारायण कोळेकर, अभिजीत रणवरे, गोपीचंद शिंदे, डॉ. दीपक निंबाळकर, सर्जेराव जामदार, दत्तात्रय सपकळ, निवृत्ती सोनवणे, तेजश्री पाटील, सुमन दराडे व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.