बारामती : महान्यूज लाईव्ह
ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदानगर येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर या शाळेतील इयत्ता आठवीच्या 14 विद्यार्थ्यांनी केंद्र शासनाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील’ विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना( NMMS) या स्पर्धा परीक्षेत परंपरेप्रमाणे बाजी मारत शिष्यवृत्ती प्राप्त केली.
सन २००७-०८ पासून विद्यालयात केंद्र शासनाच्या वतीने आयोजित व राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेमधून आतापर्यंत तब्बल १ कोटी १७ लाख ६ हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळवण्यामध्ये विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
सन 2020 – 21 या शैक्षणिक वर्षात कोरोनाची एवढी भयानक परिस्थिती असताना सुद्धा 14 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. विद्यार्थ्यांना यश मिळाले. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमचे अथक प्रयत्न करून जास्तीत जास्त शिष्यवृत्ती, गरजू मुलांना प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहतो, यापुढेही ही जबाबदारी कायम राहील असे मत मुख्याध्यापक सुर्यकांत मुंढे व स्पर्धा परीक्षा प्रमुख चंद्रकांत जराड व सोनाली काटकर यांनी व्यक्त केले.
यंदाचे शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी पुढील प्रमाणे 1) श्रेया जगताप 2)आकांक्षा गायकवाड 3) स्वराली शिंदे 4) मेघना जगताप 5) सृष्टी बर्गे 6) रेवती जराड 7) अनुष्का काळभोर 8) श्रद्धा कदम 9) संचिता सातव 10) गौरी बारटक्के 11) शिवानी भडकवाड 12) भक्ती वाघमारे 13) रेणुका वायसे 14) सृष्टी आडे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना सोनाली काटकर, चंद्रकांत जराड, संध्या सातपुते , भक्ती माने, सुरेखा कदम यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार व संस्थेच्या विश्वस्त सुनंदाताई पवार, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, समन्वयक प्रशांत तनपुरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
शिष्यवृत्ती यादी जाहीर झाल्यानंतर संचिता सातव या विद्यार्थिनीने ‘बारामती तालुका लॉकडाऊन मध्ये असतानासुद्धा शिक्षकांनी ऑनलाईन आम्हाला शिकवले, त्यामध्ये कोठेही खंड पडू दिला नाही. सातत्याने मार्गदर्शन केले. आम्ही शारदानगरमध्ये शिकतो हे आमचे भाग्य आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन मा. राजेंद्र दादा पवार, आणि विश्वस्त मा. सुनंदाताई पवार, संस्थेचे सी.ई.ओ. नलवडे सर, संस्था समन्वयक प्रशांत तनपुरे आणि मुख्याध्यापक सूर्यकांत मुंढे यांनी अभिनंदन केले.