शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर नगरपरिषदेला नव्याने मुख्याधिकारी म्हणून प्रसाद बोरकर यांची नियुक्ती झाली आहे.
मुख्याधिकारी महेश रोकडे यांची प्रशासकीय बदली झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून हे पद रिक्त होते.या पदाचा अतिरिक्त कार्यभार शिरूर तहसीलदार यांच्याकडे होता.
दरम्यान प्रसाद बोरकर यांची रोकडे यांच्या जागी नुकतीच नेमणूक झाली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
प्रसाद बोरकर यांनी या पूर्वी रत्नागिरी,पालघर आदी ठिकाणी काम केले असून त्यांनी वकिलीचे ही शिक्षण पूर्ण केले आहे.
शिरूर च्या नागरिकांच्या अडचणी,समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे बोलताना त्यांनी सांगितले.