• Contact us
  • About us
Tuesday, December 5, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्य हादरलं : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे नरबळीचा प्रकार? मूल होत नसल्याने मित्राच्या मुलाचा बळी दिला?

Maha News Live by Maha News Live
August 21, 2021
in सामाजिक, शेती शिवार, आरोग्य, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, व्यक्ती विशेष, Featured
0

कागल तालुक्यातील सोनाळी येथील वरद रवींद्र पाटील या सात वर्षीय बालकाचा त्याच्या वडिलांच्या मित्रानेच बळी घेतला. हा प्रकार नरबळीचा असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला असून पोलिसांनी मात्र ही शक्यता तूर्तास नाकारली आहे.

वरद याचा त्याच्या आजोळी सावर्डे बुद्रुक येथे मृतदेह आढळून आला. संशयित दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य ( वय ४५, रा. सोनाळी ) याला मुरगूड पोलिसांनी ताब्यात घेतले. दत्तात्रय हा वरदचे वडील रविंद्र पाटील यांचा मित्र आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. अजून या घटनेचे खरं कारण समोर आलेले नाही.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,

सोनाळी ( ता. कागल ) येथील सात वर्षांचा वरद मंगळवारी सायंकाळी त्याच्या आजोळी सावर्डे बुद्रुक येथे कुटूंबियांसह गेला होता. मामाच्या घरी वास्तुशांती होती. रात्री आठ वाजता तो घरातून बाहेर पडला. बराच वेळ तो घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोधण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही. अखेर त्याच्या अपहरणाचा संशय व्यक्त करणारी फिर्याद मुरगूड पोलिसांत पालकांनी दिली.

दोन दिवस तपास करीत असताना पोलिसांनी तो ज्याच्याबरोबर बाहेर पडला, त्या दत्तात्रय वैद्य याच्याकडे चौकशी केली. तेव्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्याने आपणच वरदचा खुन करुन मृतदेह लपविल्याची माहिती दिली.

काल पोलिसांनी वैद्य याला बरोबर घेऊन सावर्डे गावात लक्ष्मीनगर भागात जाऊन वरदचा मृतदेह शोधून काढला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. सोनाळी व सावर्डे येथील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली.

आरोपीला समोर आणल्याशिवाय आम्ही मृतदेह हलवू देणार नाही अशी भूमिका लोकांनी घेतली. त्यानंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी आर आर पाटील मुरगुड चे सहाय्यक निरिक्षक विकास बडवे यांनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र लोक संतप्त होते.

दरम्यान दत्तात्रय वैद्य याला मूल नव्हते, त्यामुळे मूल होण्यासाठी त्याने मित्राच्या मुलाचा बळी दिला असा आरोप ग्रामस्थांमधून होत होता. दरम्यान या संदर्भात अजूनही पोलिसांनी पुष्टी दिली नाही. तपासात या मधील खरे कारण समोर येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले.

पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे,अप्पर पोलिस अधिक्षक तिरुपती काकडे यांनी भेट दिली. अधिक तपास फौजदार किशोर खाडे, के.डी.ढेरे, सतीश वर्णे, स्वप्निल मोरे, संदिप ढेकळे, राम पाडळकर आदी करत आहेत.

Next Post

ही जिल्हा परिषद आहे, का भ्रष्टाचाराचे माहेरघर? पवार कुटुंबियांच्या नावाने काढलेल्या सगळ्या योजनांमध्ये कोणी केलाय कोट्यावधींचा भ्रष्टाचार? अधिकारी का राहताहेत नामानिराळे? 2019 पासून अहवाल का दाबला गेलाय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केडगावच्या बहुजन पॅटर्नचे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कौतुक! इंदापूरच्या सभेला दौंड मधून जाणार हजारो कार्यकर्ते!

केडगावच्या बहुजन पॅटर्नचे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कौतुक! इंदापूरच्या सभेला दौंड मधून जाणार हजारो कार्यकर्ते!

December 4, 2023
दौंड शुगर कारखान्यात गरम पाण्याच्या टाकीत पाय घसरून दोन मजूर कामगारांचा दुर्दैवी मृत्यू!

दौंड शुगर कारखान्यात गरम पाण्याच्या टाकीत पाय घसरून दोन मजूर कामगारांचा दुर्दैवी मृत्यू!

December 3, 2023
सलग दोन आठवड्यात दोन चक्रीवादळे! मिचॉंग ने आणला पोटात गोळा! आज देखील महाराष्ट्रात पाऊस पडणार!

सलग दोन आठवड्यात दोन चक्रीवादळे! मिचॉंग ने आणला पोटात गोळा! आज देखील महाराष्ट्रात पाऊस पडणार!

December 3, 2023
कासीम खान मशिदीत चोरी कोणी केली? छत्रपती संभाजीनगर येथील अल्पवयीन युवकापर्यंत पोलीस पोहोचले कसे?

कासीम खान मशिदीत चोरी कोणी केली? छत्रपती संभाजीनगर येथील अल्पवयीन युवकापर्यंत पोलीस पोहोचले कसे?

December 2, 2023
Special Story ! भोरच्या रायरेश्वर किल्ल्यावर उभारलेल्या डिजिटल शाळेची असामान्य गोष्ट..!

Special Story ! भोरच्या रायरेश्वर किल्ल्यावर उभारलेल्या डिजिटल शाळेची असामान्य गोष्ट..!

December 2, 2023
वेडसर मुलाने वडिलांसोबत वाद घातला आणि काय झालं, कोणास ठाऊक; वडिलांच्या डोक्यात वर्मी घाव घातला..!

वेडसर मुलाने वडिलांसोबत वाद घातला आणि काय झालं, कोणास ठाऊक; वडिलांच्या डोक्यात वर्मी घाव घातला..!

December 2, 2023
कुत्रा मांजरीला चावला.. अन् मांजरी बाप-लेकाला चावली..  बाप लेकही गेले आणि मांजरही मेली..!

कुत्रा मांजरीला चावला.. अन् मांजरी बाप-लेकाला चावली..  बाप लेकही गेले आणि मांजरही मेली..!

December 2, 2023
दौंड तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपले ! शेतकरी चिंतेत!

दौंड तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपले ! शेतकरी चिंतेत!

December 2, 2023
पाटसला वन विभागाच्या हद्दीतुन खोदलेली चारी ठरत आहे वन्यप्राण्यांसाठी धोकादायक !

पाटसला वन विभागाच्या हद्दीतुन खोदलेली चारी ठरत आहे वन्यप्राण्यांसाठी धोकादायक !

December 2, 2023
पाटसवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर! मुख्य चौक ते रस्त्यांवर २१ सीसीटीव्ही कॅमेरे करणार पाहणी!

पाटसवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर! मुख्य चौक ते रस्त्यांवर २१ सीसीटीव्ही कॅमेरे करणार पाहणी!

December 2, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group