खंडाळा : महान्यूज लाईव्ह
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एसटी स्टँड बसस्थानकातील सुलभ शौचालयामध्ये अज्ञात कारणावरुन सुलभ शौचालय चालकाचा गळा आवळून डोके आपटून मारले. या घटनेने खळबळ उडाली. रणजित गणपतराव जाधव (वय 40,रा. बौध्द आळी, शिरवळ ता.खंडाळा) असे खू’न झालेल्या सुलभ शौचालय चालकाचे नाव आहे.
याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, शिरवळ ता.खंडाळा येथील रणजित जाधव यांनी एसटी स्टँडमध्ये असणाऱ्या सुलभ शौचालय चालविण्याकरीता घेतले आहे.
दरम्यान,दि.19 रोजी नेहमीप्रमाणे रणजित जाधव हा सुलभ शौचालय याठिकाणी उपस्थित असताना त्याठिकाणी अज्ञात दोघांबरोबर अज्ञात कारणावरुन रणजित जाधव यांची वादावादी झाली. यावेळी झालेल्या वादावादीमध्ये संबंधितांनी अज्ञात कारणांवरुन रणजित जाधव याचा गळा आवळत डोके आपटल्याने रणजित जाधव हा गंभीर जखमी होत जागीच ठार झाला.
ही घटना सकाळी उघडकीस येताच शिरवळ परिसरात खळबळ उडाली.यावेळी घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. यावेळी घटनास्थळी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे ,पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सागर अरगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान,घटनास्थळी सातारा येथील रिओ श्वानाला व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
यावेळी एका संशयिताला शिरवळ पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. शिरवळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.