आठ वर्षानंतर ही मुख्य आरोपी मोकाटच, पुण्यात डॅा. दाभोलकर यांना अभिवादन..!
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॅा.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला तब्बल आठ वर्षाचा कालावधी होवून अद्याप या खुनाच्या कटातील मुख्य सुत्रधार अद्याप कोण आहेत, त्यांना का पकडले गेले नाही? का त्यांना पकडायचेच नाही?
या खुनाचा खटला न्यायालयात दाखल करण्यास विलंब का लावला जातोय ? याचा जबाब दो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्हाला मिळायला हवीत, सीबीआयने लवकरात लवकर डॅा.दाभोलकर यांच्य खुनाचा खटला न्यायालयात दाखल करावा, अशी मागणी डॅा.नरेंद्र दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोलकर यांनी केली आहे.
फुले-शाहू-आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर….
दाभोलकरांच्या खुनातील मुख्य सूत्रधाराला अटक झालीच पाहिजे. विवेकवादी विचार मिटवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आम्ही विवेकवादी विचार रुजविण्यासाठी कायम कटिबद्ध राहणार आणि विवेकाचा आवाज बुलंद ठेवणार असा घोषणा देत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुना आज शुक्रवारी ( दि.20 ) आठ वर्षाचा कालवधी झाला आहे.
त्यानिमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे शाखेच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन रॅलीचे आयोजन केले होते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून ते पुणे महानगरपालिकेपर्यंत अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अनिसंच्या कार्यकत्यांनी डॅा. दाभोलकर यांचे तैलचित्र लावून जाबब दो चे पोस्टर झळकावून सरकराचे लक्ष वेधले आहे. याबाबत डॅा. नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर म्हणाल्या की, 20 ऑगस्ट 2021 ला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. डॉक्टर दाभोलकर यांच्या खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने 2016 ला संशयित आरोपी म्हणून विरेंद्र तावडे, ऑगस्ट 2018 मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे व मे 2019 मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते.
अमोल काळे या संशयित आरोपी विरोधात सीबीआयने अद्याप आरोपपत्र दाखल केलेले नाही तसेच अमित आम्ही डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपीविरोधातही अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. सध्या या खुनाचा तपास वीरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावावर पर्यंत येऊन थांबलेला आहे.
या खुनामागील मुख्य सूत्रधार कोण आहे ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश या चारही खुनांचे एकमेकात गुंतलेली धागे-दोरे तपास यंत्रणांनी उघडे केलेले आहेत.
त्यामधील काही संशयित आरोपी समान आहेत. तसेच दोन समान शस्त्र या चारही खुनांमध्ये वापरले गेली आहेत. बंगळूरू येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार डॅा.दाभोलकर आणि कॅा. पानसरे यांच्यावर एका बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.
न्यायालयात दाखल केलेल्या शस्त्रविषयक अहवालानुसार कॅा.पानसरे यांच्या खुनासाठी वापरलेले एक पिस्तूल प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनासाठी देखील वापरले आहे. या चारही खुनांच्या संदर्भातील शेवटची अटक जानेवारी 2020 मध्ये झालेली आहे.
कर्नाटक एस.आय. टी. ने झारखंड या राज्यातून ऋषिकेश देवडीकर याला गौरी लंकेश खुनातील संशयित आरोपी म्हणून अटक केली आहे. यावरून हे खुनाचे मुख्य सूत्रधार ही एकच असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे,
डॅा.दाभोलकर यांच्या खुनातील संशयित आरोपी पकडले आहेत. मात्र खटला दाखल केला नाही. खटला दाखल करण्यास विलंब झाल्यास अटक केलेली आरोपी जामीनावर बाहेर सुटू शकतात, यातील एक आरोपी विक्रम भावे हा जामीनवर सुटला आहे.
आम्ही त्यांच्या विरोधात सर्वच्च न्यायालयात गेलो आहे. आठ वर्षानंतर ही अद्याप हा खटला सुरू झाला नाही, सीबीआयने आम्हाला सांगितले आहे की,हा खटला लवकर सुरू करीत आहोत, कॅा.पानसरे,गौरी लंकेश प्रा.कुलबुर्गी यांचे खुनातील आरोपी आणि नालोसपोरा येथे सापडलेला प्रंचड शस्त्रसाठा हे पाच ही गुन्हे एकमेंकांशी जोडलेले आहेत.
वेगवेगळ्या ठिकाणी पकडलेले आरोपी आणि साक्षीदार हे समान आहेत. हा एक व्यापक कटाचा भाग आहे. यामुळे या कटाचे मुख्यसुत्रधार कोण आहेत. हे समोर येणे गरजेचे आहे. या खुनातील मुख्यसुत्रधारांना लवकर अटक केली पाहिजे, याबाबत आम्ही सातत्याने सीबीआय आणि सरकारकडे मागणी करीत आहोत.
तसेच या मुख्य सूत्रधारांकडून राज्यातील आणि देशातील अनेक विवेकवाधी विचारवंताच्या जीवीतांना धोका निर्णाण झाला आहे. डॅा. दाभोलकर यांच्या खुनाला आठ वर्षांनंतर ही आम्ही डॅा. दाभोलकर यांचे काम पुढे सुरू ठेवले आहे. यात आमचा कोठेही खंड पडलेला नाही, असेही मुक्ता दाभोलकर यांनी सांगितले.
दरम्यान, आज महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून ते पुणे महानगरपालिकेपर्यंत अभिवादन रॅलीत महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्यकार्यकरणी सदस्य मिलिंद देशमुख,नंदिनी जाधव, राज्यप्रशिक्षण विभागाचे अनिल वेलाळ, अनिंसचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीराम नलावडे, अनिल तिकोवणकर, माधव गांधी,समविचार संघटना मुस्लिम सत्यशोधक संघटनेचे अध्यक्ष डॅा. समशोद्दीन तांबोळी, अॅड. शिला परळीकर आदी सहभागी झाले होते.