पुणे : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना दुसऱ्यांदा कोरोना ची लागण झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना च्या दोन्ही लसीचे डोस घेतल्यानंतर देखील ही लागण झाल्याने अमोल कोल्हे यांनी, शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळा आणि नियमांचे काटेकोर पालन करा असे आवाहन केले आहे.
कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे.
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 20, 2021
या संदर्भात खासदार अमोल कोल्हे यांनीच स्वत माहिती दिली असून, त्यांनी केलेल्या स्पष्टीकरणानुसार कोरोनाचे संकट अजूनही कळलेले नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश्य लक्षणे दिसत होती. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत.
मात्र चाचणी केल्यानंतर माझा rt-pcr अहवाल पॉझिटिव्ह आला. आता प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. मतदार संघातील पूर्व नियोजित दौरे व सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत, अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
दरम्यान कोल्हे यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांसाठी आवाहन केले आहे की, लक्षणे आढळून आल्यास चाचणी करून घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी टाळावीत आणि सर्वांनीच निर्धारित नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.