संदीप मापारी पाटील, बुलढाणा
समृद्धीच्या महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांच्या ट्रकला मोठा अपघात झाला असून सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड तळेगाव येथे हा अपघात झाला. १५ मजूरांपैकी १३ मजुरांचा मृत्यू यामध्ये झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
याचा व्हिडिओ येथे पहा. अथवा महान्यूज लाईव्ह चॅनल वर पाहू शकता.
लोखंडी सळई घेऊन हा ट्रक निघाला होता. दुसर बीड येथून समृद्धी हायवेच्या कामावर बिहारी मजूर निघाले होते ते मजूर ट्रक मध्ये होते. एकूण १५ मजुरांना घेऊन जाणारा आणि लोखंडी सळई घेऊन जाणारा ट्रक उलटला. आणि त्याखाली १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
इतरही काही मजूर यामध्ये जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी स्थानिकांनी मदत करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर जवळील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. मात्र या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला आहे.