सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडविणारा इंदापूरचा मोहरम हा सण सुमारे ३५० वर्षापासून पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दर वर्षी हिंदू मुस्लीम एकत्र येवून यामध्ये सहभागी होतात, परंतु कोरोनाच्या संकट यंदाही टळलेलं नाही. यामुळेच यावर्षीचा मोहरम साध्या पध्दतीने साजरा होत आहे.
साडेतीनशे वर्षापासून चालत आलेल्या शेख मोहल्ला व कसबा येथील ताबूतांची डावी व उजवी अशी गळाभेट ठरणाऱ्या भेटीच्या क्षणाला टिपण्यासाठी मोठी गर्दी उसळत असते. मात्र या परंपरेस इंदापूरकरांना कोरोनामुळे यावर्षी सुद्धा मुकावे लागणार आहे.
इंदापूर चा मोहरम हा पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. साडे तीनशे वर्षांपासून इंदापूरच्या हिंदू मुस्लिम बांधव यामध्ये सहभागी होत असून सर्व कार्यक्रम व्यवस्थितरीत्या पार पाडले जातात. इंदापूर चा मोहरम पाहण्यासाठी पूर्वीपासून गर्दी दिसून येते.
सातपुडा भागातील मानाची शेख फरिदबाबाची सवारी ही पद्माकर (बाळू) राऊत हे घेतात. मोहरमच्या ९ वी या कत्तल कि रात या दिवशी सवारी निघते. व गाव प्रदक्षीणा करून भेटीचा कार्यक्रम होतो.
यावर्षी प्रशासकिय नियम पाळून घरगुती पध्दतीने मोजक्याच लोकांत विधिवत पुजा होऊन साध्या पध्दतीने हा कार्यक्रम साजरा झाला. यावेळी प्रविण राऊत, महादेव चव्हाण सर, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार उपस्थित होते.
यावेळी बोलताना हमीदभाई आत्तार म्हणाले की, मोहरम हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते.
त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात. यंदा मोहरम १२ ऑगस्ट पासून सुरू होत आहे. मोहरमपासून हिजरी संवत सुरू होते. हिजरी संवतचा हा पहिला महिना असतो.अशी माहीतीही हमीदभाई आतार यांनी दिली.
दोन्ही ताबूत पांढऱ्या शुभ्र कपडयांपासून बनवलेले असतात. 55 मीटर पांढऱ्याशुभ्र कपड्यांपासून हे ताबूत बनवले जातात. आज मोहरम निमित ताबूतांची डावी उजवी (गळाभेट) मोठा भाऊ हा शेख मोहला ताबूत व लहान भाऊ हा कसबा येथील ताबूत यांची डावी उजवीही नेहरू चौकात होते. त्याला सुमारे साडेतीनशे वर्षापुर्वीचा इतिहास असणारा गळा भेटीचा क्षणाला वर्षी कोरोनाच्या संकटामुळे मुकावे लागणार आहे.