शिरूर : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षक व सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी या बदल्या जाहीर केल्या असून बारामती विभाग, पुणे विभाग आणि पुणे ग्रामीण अशा तीन टप्प्यातील या बदल्या आहेत.
या बदलांमध्ये दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे, तर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांची इंदापूर पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली आहे.
पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांना प्रशासकीय मुदतवाढ दिली असून, दौंडचे सहायक निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनाही पुढील प्रशासकीय बदली पर्यंत मुदत वाढ दिली आहे. फौजदार शामराव मदने यांना ही मुदतवाढ दिली असून, वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे फौजदार दिलीप देसाई यांना सेवानिवृत्त होणार असल्याने मुदतवाढ दिली आहे.
यवत चे निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांची जिल्हा विशेष शाखेत, बारामती शहर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक अश्विनी शेंडगे यांची तालुका पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रमोद पोरे यांची शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
आळेफाटा पोलीस ठाण्याचे फौजदार सतीश नवले आता घोडेगाव पोलीस ठाण्याचे फौजदार असतील. भोर पोलीस ठाण्याचे फौजदार राजेंद्र पवार आळेफाटा पोलीस ठाण्याचे फौजदार असतील. शिक्रापूर चे सहायक निरीक्षक नवनाथ रानगट हे आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक असतील. वडगाव मावळ चे दौंडचे फौजदार प्रकाश खरात बारामती तालुका पोलिस ठाण्यात होणार आहेत.
दौंड पोलीस निरीक्षक नारायण पवार हे यवत पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राहतील. जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांची स्थानिक गुन्हे शाखेत तर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे भोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक असतील.
नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक विनोद प्रभू घुगे यांची दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे, तर नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांची नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे. नियंत्रण कक्षातील भगवंत मांडगे यांची रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली असून, रांजणगावचे पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांची शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे.
तर नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांची लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली असून, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट हे यापुढील काळात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक असतील. शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे हे नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक असतील.
रांजणगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप वेळे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक राहतील. सासवडचे सहायक निरीक्षक राहुल घुगे हे बारामती तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राहतील. भिगवण चे सहाय्यक निरीक्षक जीवन माने घोडेगाव पोलीस खात्याचा कार्यभार सांभाळतील तर वालचंदनगर चे सहाय्यक निरीक्षक दिलीप पवार भिगवण पोलिस ठाण्याचा कार्यभार सांभाळणार आहेत.
इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सहायक निरीक्षक बिराप्पा लातुरे हे वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक असतील. कामशेतच्या फौजदार सुरेखा शिंदे या लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फौजदार असतील. इंदापूर चे फौजदार संजय धोत्रे खेड विभागाचे वाचक असतील.
मंचरचे संजय खबाले यांची सायबर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. लोणावळ्याच्या महिला फौजदार प्रियांका माने यांची पोलीस ठाण्यात तर शिरूरचे फौजदार सुनील मोटे यांची वेल्हा पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.