बारामती : महान्यूज लाईव्ह
मामा-मामी च्या घरी राहणारी, सीए होण्याचे स्वप्न पाहणारी, संयमी अशी भूमिका कृष्णाची असून वाघोबा प्रोडक्शन या मालिकेची निर्मिती केली आहे. अनिकेत साने या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. या मालिकेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मराठी रसिकांना वेड लावलेल्या चांडाळ चौकडी च्या करामती मधील रामभाऊ, बाळासाहेब हे कलाकारही असणार आहेत. त्याचबरोबर सैराट मधील बाळ्या आणि सल्या ची जोडी देखील असणार आहे.
झी मराठीवर 23 ऑगस्ट पासून मन झालं बाजींद ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील मुख्य भूमिका ‘राया’ची असणार असून ती भूमिका बारामतीकर वैभव अजित चव्हाण साकारणार असून, साताऱ्याची अभिनेत्री श्वेता राजन खरात ही ‘कृष्णा’च्या भूमिकेत असणार आहे.
ही मालिका 23 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. परंतु मागील एक महिन्यापासून झी टीव्हीवर जशी याची जाहिरात सुरू झाली, तसे लोक बाजिंद चा अर्थ शोधायला गुगलचा आधार घेत होते. गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला शब्द बाजींद हा दिसून आला.
बाजींद चा नेमका अर्थ काय लोकांना पडलेला प्रश्न होता. या एक महिन्यात सर्वाधिक वेळा सर्च केलेला शब्द होता, ‘बाजिंद’! त्याचा अर्थ काय? हा अनेकांना पडलेला प्रश्न येत्या 23 ऑगस्टपासून सुटायला सुरुवात होईल. मात्र अशोक समर्थ यांच्यानंतर छोट्या पडद्यावर मुख्य भूमिकेत वैभव चव्हाण ला पाहून तो बारामतीकर नक्कीच खुश होतील.