सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे इंदापूर – बारामती रस्त्यावर एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील तीस वर्षीय महिला व वीस वर्षीय युवक अशा दोघा जणांचा मृत्यू झाला.
या घटनेत निकिता सोपान शिंदे (वय 30 वर्षे, रा. चाळीस फुटी रोड इंदापूर ता. इंदापूर जि. पुणे) व विश्वजीत गणपत अनारसे (वय 20 वर्ष, रा. माळवाडी नंबर 2 ता. इंदापूर जि. पुणे) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
हे दोघे बारामती इंदापूर रस्त्याने इंदापूरकडे येत असताना स्कूटीला (क्रमांक एम एच 42 ए झेड 0639) अज्ञात वाहनाने धडक दिली व ते वाहन अपघात करून निघून गेले. स्थानिक लोकांनी रुग्णवाहिकेत घेऊन इंदापुरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता, त्या ठिकाणी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
या संदर्भात सोमनाथ सोपान शिंदे यांनी फिर्याद दिली असून खबर दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने करत आहेत. यासंदर्भात पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.