दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
धोम (ता.वाई) येथील रहिवासी असलेले जगन्नाथ गोपाळा पोळ यांचे वयाच्या ८४व्या वर्षी अल्प आजाराने दुःखद निधन झाले.
भुईंज पोलिस ठाण्याचे हवलदार सुनील पोळ यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात १ मुलगा १ मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्यावर धोम येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार आणि पोलिस दलातील अनेक मान्यवर उपस्थित होते .